माझे आदर्श गाव निबंध| majhe aadarsh gav

 माझे आदर्श गाव निबंध | majhe aadarsh gav nibandh

माझा गाव निसर्गरम्य परिसरामध्ये वसलेले छोटेसे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अतिशय लहान असले तरी खूप चांगले आहे .

              काय तो गाव|काय ती माणसे 

              काय ती हिरवळ |काय तो निसर्ग|

              सगळं व्यवस्थित| उत्तम आहे बघा ||

आमच्या गावात सगळ्यांना गावामध्ये रोजगाराच्या संधी मिळत असतात .तरीही लोकसंख्येच्या मानाने गावामध्ये भरपूर प्रमाणात ऐसपैस जागा उपलब्ध आहे. राहण्यासाठी कोणालाच जागेची कमतरता भासत नाही .गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने नांदत असतात .

 गावाचे एक वैशिष्ट्य असं आहे की कोणत्याही जातीचा वेगळा असा कोणताच गट नाही, जो इतर गावांमध्ये दिसत असतो . सर्व जाती -धर्माचे लोक यामध्ये सामील होत असतात. गावामध्ये अनेक भागातील कामगार रोजगार मिळावा यासाठी येत असतात, त्यामुळे गावातील प्रत्येक कामगाराला काम मिळतच असते .कोणीही मनुष्य काम नाही म्हणून कामासाठी दुसरीकडे जाऊ शकत नाही. उलट दुसऱ्याच गावातील लोक गावामध्ये येऊन आपला रोजगार प्राप्तीसाठी येत असतात.

 गावाची लोकसंख्या ही जरी कमी असली तरी राजकीय दृष्ट्या पंचक्रोशीत गावाची वाहवा होत असते .तालुका पातळीवर या गावाचे खूप मोठे नावलौकिक आहे . गावात अनेक जाती धर्माचे लोक असले तरी अध्यात्मिकदृष्ट्या गाव हे गुण्यागोविंदाने राहत असते.

  गावात भक्तमंडळ भरपूर आहेत त्यापैकी गावात आराधी मंडळ ,वारकरी संप्रदाय, निरंकारी मंडळ ,शिवभक्त हे जरी असले तरी सुद्धा गावामध्ये सर्व एकोप्याने राहत असतात. कोणी कोणाच्या संप्रदायाला वाईट नजरेने पाहत नाही .

फार श्रीमंत लोकांचा गाव नसला तरी मनाने श्रीमंत असणाऱ्या लोकांचा गाव आहे. या गावात हिरववीगार शेते डोलू लागत असतात .या शेतकऱ्यांच्यात कामाला जाणारे मजूरवर्ग मात्र गावामध्ये भरपूर प्रमाणात आहे . गावात पिकांची हिरवळ सगळीकडे दिसत आहे. गावात पाण्याची कोणतीच कमतरता नाही. गावाच्या शेजारून जाणारा कॅनॉल हा शेतकऱ्यांना मोठा दिलासादायक असतो; जरी कॅनॉल नसला तरी विहिरीचे पाणी भरपूर प्रमाणात असते. थोडाफार उन्हाळ्यामध्ये होतो त्रास तरीही त्यातून शेतकरी निभावून निघतात .

गावात राजकीय परिस्थिती खूप जोमाने चालत असते. कोणतेही इलेक्शन घ्या ,की दोन पार्टी होतातच. राजकीय परिस्थिती ही राजकारणापुरतीच मर्यादित राहत असते. त्यानंतर मात्र सगळे गुण्यागोविंदाने एकत्र जेवणखाण ,सण ,उत्सव, लग्नासमारंभ या सर्व कार्यात एकत्रपणे येताना दिसत असतात. हेच माझ्या गावचे खरंतर मोठेपण आहे.

 कोणीही कोणाविषयी द्वेष, मत्सर, राग  असला तरी तो लटका असून तो मर्यादित वेळेपर्यंतच असतो ,नंतर मात्र हातात हात घालून एकमेकांच्या सहवासात, विचारात दिवस काढत असतात.

 गावचे एक वैशिष्ट्य म्हणजे गावाच्या दक्षिण बाजूला चार ते पाच किलोमीटर अंतरावर मोठा पालखी महामार्ग ( ज्ञानेश्वर महाराज ) जात असल्याने गावाला आध्यात्मिक बाजूचा वाटा सहज मिळत असतो . गाव हे रस्त्यापासून आत असल्यामुळे गावात जास्त सोयी सुविधांनी युक्त जरी नसले तरी ,मात्र लोकांच्या मनामध्ये भरभरून प्रेम देणारे असे गाव आहे. लोकांना संस्कार व्हावेत म्हणून ते आपल्या मनावर बिंबविणे गरजेचे आहे म्हणून प्रत्येक वर्षी अखंड हरिनाम सप्ताह  सप्ताह मंडळ घेत असते .

तसेच निसर्गरम्य परिसरात पद्मावती मंदिर आहे त्या पद्मावती मंदिरासमोर आजूबाजूला अकवल वृक्षाची दाटी आहे. हे वृक्ष कित्येक वर्षापासून जसे आहेत तशीच आहेत .त्याच्यामध्ये वाढ झालेली दिसत नाही, ना कोणतेही झीज झालेली दिसत नाही . पण, ते कायम हिरवीगार असतात .

उन्हाळ्यामध्ये गावातील लहान -थोर माणसांना या हिरवळीचा खूप आधार असतो. या ठिकाणी येऊन काही लोक पहुडले जातात काहींची झोप तर अशी होते की झोपेतून जागे झाल्यावर एवढा वेळ झाला म्हणून आवाक होतात .

गप्पा मारण्याचे एक ठिकाण आहे गावात उसाचे प्रमाण जास्त प्रमाणात होत असल्याने लोकांकडे जनावरांसाठी गवत चाऱ्याची मुबलकता भरपूर प्रमाणात आहे.

 शिवाय सकाळ -संध्याकाळ मंदिरात संपूर्ण गावाला आवाज जाईल असा लाउड स्पीकर लावलेला असून सकाळी आणि संध्याकाळी भक्ती गीते लावली जातात .त्यामुळे लोक कामाहून कंटाळून जरी आले तरी त्यांच्या कानावर भक्तीगीत पडल्यामुळे त्यांचा उत्साह अधिक जोमाने वाढत असतो. पहाटेच्या वेळी ही साखर झोपेत असताना लावलेले भक्ती गीत हे मनाला प्रसन्नता देत असते, मन ताजेतवाने होत असते .

           माझ्या गावाची काय सांगू महती | 

            सांगावे तेवढे नवलच आहे ||

           जरी असतील मतभिन्नता |

           तरी दाखवतील संकटी एकोपा||


असे हे माझे एका लाखात एक आहे . गाव ते गावच असते गावाने आपल्याला घडवलं ,शिकवलं त्या गावची माती कधीच विसरता येत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

WP Safelink