पंढरीची वारी निबंध | pandharichi vari essay

पंढरीची वारी निबंध | pandharichi vari essay


 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी अशा नामस्मरणात दंगून  जयघोष करीत वारकरी हा वारी  करीत चालत असतो. त्या विठू माऊलीचे  दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांचा सारा खटाटोप चाललेला असतो, म्हणून वारकरी हा सर्वगुणसंपन्न असा असतो.   

         जाता पढरीशी  |सुखे वाटे जीवा

हा वारकरी कोणताही अहंकार मनात नसतो. तो आपली पायी वारी एक निष्ठेने चालत असताना 15- 20 किमी एवढे अंतर दररोज चालत असूनही कोणताही थकवा त्यांच्यामध्ये दिसत नाही .
 कोणतीही मरगळ चेहऱ्यावर आणत नाही.सगळ्यांना वारकरी आपला वाटत असतो ,सर्व स्तरात मिसळत असतो आणि तो या भूमिकेमुळे त्यास उच्च दर्जाचा मान मिळाला आहे  .वारकरी हा कोणत्याही अपेक्षेविना जीवन जगत असतो, म्हणून त्यास समाजात वेगळी अशी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे .अशा या वारकऱ्याचे जेवढे गुणगाण गावे तेवढे कमीच आहे .

      पंढरीचा वारकरी
     त्याचे पाय माझे शिरी 
      होता उत्तम चांडाळ  
असा वारकरी तो कसाही असला तरी त्याची पांडुरंगाच्या दारी वारी होते ,मग तो कसाही असला तरी तो एक वारकरी आहे ;एवढेच डोक्यात असते . 

वारकऱ्यांचा नियमही खूप साधे असतात सगळ्या ठिकाणी मिसळत असतात . वारकऱ्याला कोणीही हिनतेने वागवत नाही .वारकरी नेहमी आदर्श राहिला आहे. त्याचा आदरभाव केला जातो म्हणून आजही लोक वारकरी यांच्या चरणावर नतमस्तक होताना दिसतात.

वर्षात दोन वेळ पंढरपूर यात्रा असते ,पण त्यापैकी आषाढी वारी ही सर्वात महत्त्वाची असून वारकरी पांडुरंगाच्या मंदिराच्या कळसाचे का होईना दर्शन घेऊन माघारी जात असतात. अशा  वारकऱ्यांची महती वर्णावी तेवढी कमी आहे .
आषाढी वारीला वारकरी आणि इतरही लोक आळंदी - देहू या ठिकाणाहून पायी वारी पंढरपूरपर्यंत करीत असतात. म्हणून  अशा  वारकऱ्यांसाठी लाखों लोक अन्नदान करीत असतात .
वारीचे एक वैशिट्यय असे आहे की, कोणीही या वारीत उपाशी राहत नाही ,तर् सगळे जेवून खावून मस्त चालण्याचा आनंद घेत असतात. शिवाय कोणताही त्रास झाला तरी त्यास कशाचीही पर्वा नसते म्हणूनच अशा ऊन पावसाची तमा न बाळगता त्यास या वारीचा अत्यानंद मिळत असतो . असा वारीचा आनंद सोहळा ज्याने केला  त्यालाच समजणार आहे .त्यास आशा वारीचा आनंद घेण्यासाठी प्रत्यक्ष वारी करावी मग त्याची  मजा काही औरच  (वेगळीच )असते  .
 असा पांडुरंग परमात्मा सगळ्यांना आपलसे करत ठिकाणी कोणताही दुजाभाव केला जात नाही त्यास आनंद हा असतो की त्याच्या हातून कोणाचेही वाईट होता काम नये ,वारकरी  हा कसाही असला तरी वारी करीत असताना प्रत्येकाच्या तोंडी एकच शब्द निघत असतो; तो म्हणजे राम कृष्ण हरी होय.
मागे 
         मागे हळू हळू चाला
         मुखाने माऊली माऊली बोला

शिवाय सगळेजण एकमेकांना 'माऊली 'अशा शब्दातच संपूर्ण वारी पूर्ण करीत असतात. लहान थोर असतील त्यांनाही माऊली म्हणून संबोधले जाते . त्यामुळे या ठिकाणी जो  वारकरी असतो तो वेगळाच असतो . त्यासाठी त्याला जो अहंकार नाहीस झालेला असतो हेच मोठे वैशिष्ट्ये आहे .  



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

WP Safelink